थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune) पुण्यात मद्यधुंद तरुणाने नारायण पेठेत धिंगाणा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा पार्टी करून आलेल्या तरुणाने नारायण पेठेमध्ये धिंगाणा घातला. मी पोलिसाचा मुलगा आहे असे म्हणत हा तरुणाने रस्त्यावर गोंधल घातला.
फोर व्हिलर गाडीमधून हे तरुण-तरुणी जात असताना एका अपंग व्यक्तीला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र हा तरुण एवढा गोंधळ करत असताना पोलीस मात्र वेळ घालवत असल्याचा स्थानिकांकडून आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी कारचालक कार मधील तरुण-तरुणी आणि अपंग व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
Summery
पुण्यात मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा
पोलिसाचा मुलगा आहे म्हणत रस्त्यावर धिंगाणा
रस्त्यावर एका अपंग व्यक्तीला धडक दिल्याने गोंधळ