मध्यंतरी काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेल च्या किंमती आता पुन्हा वाढू लागल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आयातीचा विचार करता भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक मोठा आयातय देश आहे. कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फटका पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीला बसला असून त्याच्या विक्रीत 9.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या सात वर्षापासून, 2014 पासून केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने इंधनावरच्या करात सातत्यानं वाढ केली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना इतर देशांच्या तुलनेत जास्त दराने पेट्रोलची खरेदी करावी लागते.
पुण्यातील भोर आगारावर इंधन संपल्याने, एसटी बस सेवा ठप्प होण्याची वेळ सध्या आली आहे. डिझेलचा पुरवठा होत नसल्याने बस सेवा सुरु ठेवण्यासाठी मोठी कसरत आगार व्यवस्थापनाला करावी लागत आहे. भोर आगारात उभ्या असलेल्या बसमधले शिल्लक डिझेल कॅन मध्ये गोळा करुन कॅनमध्ये एकत्र केलेले डिझेल नंतर एका बसमध्ये टाकले जात आहे. आणि ती पुढच्या प्रवासासाठी मार्गस्त केली जात आहे. गेले दहा दिवस भोर आगारात डिझेल पुरवठाच होत नसल्याने, आगार व्यवस्थापनाला अशा प्रकारे बस चालवण्याची वेळ आली आहे. एस टी बसेस फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्याने आगारात बसून राहण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आली आहे.