थोडक्यात
कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मुसळधार पाऊस सुरु असल्याने दरड कोसळण्याची भीती
(Koyna Dam Earthquake ) कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का बसला आहे. रात्री 12 वाजून नऊ मिनिटांनी भूकंपाचा हा धक्का बसला असून रात्रीचा वेळेस भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेलं आहे.
कोयना धरण सुरक्षित असून धरणाला कोणताही धोका नाही. मुसळधार पाऊस सुरु असल्याने दरड कोसळण्याची भीती डोंगरा शेजारी असलेल्या गावांना कायम असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
3.4 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झालेला असून भूकंपचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून जवळ असलेल्या हेळवाक गावात आहे.