थोडक्यात
लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात भूकंपाचे धक्के
2.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद
कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले
(Earthquake) लातूर जिल्ह्याला सौम्य भूकंपाचा धक्का बसला आहे. काल रात्री 8 वाजून 13 मिनिटाला हा भूकंपाचा धक्का बसल्याचं प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे. लातूर जिल्ह्यातील मुरुड अकोला परिसरात 2.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून या भूकंपाचे केंद्रबिंदू लातूर शहराच्या पश्चिम बाजूस मुरुड अकोला परिसरात असून, भूकंपाची खोली ५ किलोमीटर असल्याची माहिती मिळत आहे.
ही भूकंपाची नोंद सौम्य स्वरूपाची असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.