थोडक्यात
तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी गावात भूकंपाचे धक्के
सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले
गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
(Amravati Earthquake) अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात शिरजगाव मोझरी गावात भूकंपाचे धक्के बसले आहेत. भूकंपाच्या धक्क्याने गावातील अनेक घरातील भांडी पडल्याची घटना तर एका ठिकाणी नाल्याला भेगा गेल्याची ग्रामस्थांनी माहिती दिली आहे.
शिरजगाव मोझरीमध्ये सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के बसले असून भूकंपाचे धक्के बसल्याने गावातील नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचं वातावरण पसरले. काही वर्षांपूर्वी ही गावात अशाच पद्धतीने दोनदा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
भूकंपाच्या धक्क्यामुळे कुठेही गावात नुकसान झाले नसल्याची माहिती मिळत असून भूकंप झाल्याची नोंद अॅपवर नाही अशी जिल्हा प्रशासनाची प्राथमिक माहिती आहे. तसेच स्थानिक तिवसा तालुका महसूल प्रशासन शिरजगाव मोझरीमध्ये माहिती घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.