Eknath Khadse Team Lokshahi
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस

Eknath Khadse 5 कोटी 73 लाख रुपयांच्या मालमत्तेप्रकरणी ईडीची नोटीस

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना आज अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस बजावली आहे. भोसरी एमआयडीसी जमिन कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ही नोटीस बजावली आहे. याप्रकरणी एकनाथ खडसेंच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली होती. आता या मालमत्ता निष्कासित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे..

एकनाथ खडसे आणि इतर ४ जणांना पीएमएलए कायद्याअंतर्गत नोटीस बजाविण्यात आली आहे. यामध्ये खडसे यांची पत्नी मंदाकिनी, गिरीश चौधरी, इन्सिया मुर्तजा बदलावाला आणि फक्ररद्दीन उकानी यांचा समावेश आहे. मंदाकिनी, गिरीश चौधरी यांच्या नावावरील मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ती आता निष्कासित करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये लोणावळामधील एक बंगला आणि जळगावमधील 3 फ्लॅट असे एकूण 5 कोटी 73 लाख रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे 31 कोटी रुपये किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.75 कोटी रुपयांमध्ये विक्री झाल्याचा दावा करण्यात आला होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!

Teachers Strike : शिक्षकांची शाळा बंदची हाक, सरकारला दिला आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Saif Ali Khan : सैफ अली खानला मोठा झटका – 15 हजार कोटींच्या मालमत्तेवर ‘शत्रू मालमत्ते’चा शिक्का