थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Nagpur ) नागपूरात वाळू व्यावसायिकांवर ईडीने छापा टाकल्याची माहिती मिळत आहे. सावनेर, खापामध्ये वाळू व्यवसायिकांवर छापा टाकण्यात आला असून 2021 मध्ये काही वाळू व्यावसायिकांवर शासनाची वाळू संदर्भातील रॉयल्टी चुकवून वाळू व्यवसाय केल्याचा आणि कोट्यवधी रुपयांची वाळू विकल्याचा गुन्हा नागपूर पोलिसांनी दाखल केला होता.
त्याच अनुषंगाने या रॉयल्टी चुकवून वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना ईडीने वारंवार चौकशीसाठी बोलावले होते. मात्र चौकशीत सहकार्य न केल्यामुळे आता ईडीचे छापे नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
नागपुरात वाळू व्यवसायिकांवर ईडीचा छापा
सावनेर,खापामध्ये वाळू व्यवसायिकांवर छापा
नियमांचं उल्लंघन करून वाळूविक्री प्रकरणी कारवाई