महाराष्ट्र

अकोल्यात आठ महिन्याच्या चिमुकलीला HIV चा संसर्ग; आरोग्य मंत्र्यांकडे न्याय मागणार

Published by : Lokshahi News

बंटी नांदूरकर | अकोल्यातील नामांकित रक्तपेढीमुळे एका आठ महिन्याच्या चिमुकलीला HIV चा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार आठ महिन्यानंतर तपासणी केल्यावर उघडकीस आला. यासंदर्भात चिमुकलीच्या नातेवाईकाने आरोग्य मंत्र्यांसह विविध ठिकाणी तक्रारी करून न्याय मागितला आहे. 

अकोल्यातील मूर्तिजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना एका आठ महिन्याच्या चिमुकलीचा ताप काही केल्या कमी होत नव्हता. डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्यानंतर चिमुकलीच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यासाठी पांढऱ्या रक्ताची आवश्यकता आहे ते तिला देणे गरजेचे असून अकोला येथील बी. पी. ठाकरे रक्तपेढीतून रक्त आण्याचा सल्ला चिमुकलीच्या पित्याला देण्यात आला होता.

त्यानुसार पित्याने रक्त आणत ठरल्याप्रमाणे संकलीत केलेले रक्त आठ महिन्याच्या चिमुकलीला देण्यात आले परंतु काही केल्या तिचा ताप व पेशी वाढत नव्हत्या. त्यामुळे जास्त वेळ न दवडता चिमुकलीला मूर्तिजापूर येथून अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांना एचआयव्ही असल्याचा संशय आल्याने चिमुकलीची एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले. तपासणीअंती तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी आई-वडीलांना एचआयव्ही तपासणी करण्यास सांगीतले तेव्हा दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आला. तोघांचाही अहवाल निगेटिव्ह असताना मुलगी पॉझिटिव्ह कशी ? ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

त्या दिशेने शोध घेतला असता संक्रमित रक्त चढविल्याने तिही संक्रमित झाल्याचे संशय तिच्या माता पित्यांना आला. ह्या प्रकरणी न्याय मिळण्यासाठी चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. 

एका संक्रमित व्यक्तिचे रक्त चिमुकलीला देण्यात आले. याची आता आरोग्य विभागाकडून चौकशी होणार आहे. मात्र अक्षम्य चुकीमुळे चिमुकलीला या भयंकर आजाराचा आयुष्यभर सामना करावा लागणार आहे, असे अकोल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा