महाराष्ट्र

Sanjay Raut: संजय राऊतांचा पुतळा जाळला, रस्त्यावर उतरून लढाई करून दाखवा म्हणत तीव्र संताप

शिंदे विरोधात अपशब्द काढला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी शिंदे समर्थकांनी संजय राऊतांना दिला.

Published by : Shweta Chavan-Zagade

अमजद खान | डोंबिवली : राज्यातील सत्तासंघर्ष अधिकच चिघळत चालला आहे. या साऱ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेनेच्या (shivsena) नेत्यांकडून बंडखोरांवर कठोर टीका केल्या जात आहेत. त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसून येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते संजय राऊत (sanjay raut) मेळाव्यांमध्ये बंडखोराविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आज (27 जूनला) एकनाथ शिंदे समर्थकांनी डोंबिवली (dombivali) घार्डा सर्कल येथे संजय राऊत यांचा पुतळा जाळून संजय राऊत यांचा निषेध नोंदवला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने देखील शिंदे आणि बंडोखोराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

यावेळी शिंदे समर्थकांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊत हे रस्त्यावर लढाई लढण्यासाठी तयार आहोत असं सांगत आहेत. राऊत साहेब आम्ही पण तयार आहोत रस्त्यावर उतरून लढाई करून दाखवा असे आव्हान शिंदे समर्थकांनी केलं.

राऊत यांनी स्वतः किती नगरसेवक आमदार खासदार निवडून आणलेत असा प्रश्न शिंदे समर्थकांनी करत, इथून पुढे शिंदे विरोधात अपशब्द काढला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा यावेळी शिंदे समर्थकांनी दिला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच