थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अनेक बैठका घेतल्या जात असून प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज एकनाथ शिंदे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आज एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभा होणार आहेत.
सटाणा, मनमाड, पिंपळनेर, सिन्नर आणि वैजापूरमध्ये या सभांचे आयोजन करण्यात आले असून या सभांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभांमधून एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे देखील सज्ज
शिंदेंची आज नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरात प्रचार सभा
सटाणा, मनमाड, पिंपळनेर, सिन्नर आणि वैजापूरमध्ये सभा