थोडक्यात
'सख्खा लाडका भाऊ, हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद'
'मी काळजीवाहू मुख्यमंत्री सगळ्यांची काळजी घेतो
एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत विधान
महायुतीची काल दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, महायुतीची महाबैठक सकारात्मक झाली. मुंबईत बैठक होणार आहे. माझी भूमिका मी स्पष्ट केली. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, अमित शाह साहेबांशी देखील माझी चर्चा झाली.
आमची भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे की, महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा असेल. सत्तास्थापनेबाबत चर्चा झालेली आहे. वेगळी काही चर्चा झालेली नाही आहे. आमच्यामध्ये पूर्णपणे समन्वय आहे. लवकरच सरकार स्थापन करु.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. सगळ्यांची काळजी घेतो आहे. कुठलाही अडथळ महायुतीचा मुख्यमंत्री होण्यामध्ये नाही आहे. लाडक्या बहिणीच्याबद्दलही बोललो आहे मी. लाडका भाऊ दिल्लीत दाखल झालेला आहे. लाडका भाऊ ही ओळख माझी सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. असे एकनाथ शिंदे म्हणाले.