थोडक्यात
उपमुख्यमंत्री शिंदे 7 नोव्हेंबरला बिहार दौऱ्यावर
बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे मैदानात
बिहार दौऱ्याआधी कांदिवलीत बिहार निवडणुकीसाठी सभा
(Eknath Shinde ) बिहार विधानसभा निवडणुका 6 आणि 11 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये होत असून 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री शिंदे 7 नोव्हेंबरला बिहार दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
बिहार निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत असून याच बिहार दौऱ्याच्याआधी एकनाथ शिंदे कांदिवलीत बिहार निवडणुकीसाठी सभा घेणार आहे. या सभेतून एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.