महाराष्ट्र

'बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाचा...'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदेचं ट्वीट

Published by : Shweta Chavan-Zagade

महाराष्ट्रातील सत्तांतराचा वाद थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला असून, न्यायालयाने शिवसेनेतील बंडखोर 16 आमदारांना मोठा दिलासा दिला आहे. बंडानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिंदेच्या या याचिकेवर आजा सुनावणी झाली असून, न्यायालयाने शिंदे गटाला दिलासा दिला. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे (anand dighe) यांचा विजय असल्याचे म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत, "हा वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या हिंदुत्वाचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय..!" दरम्यान शिंदे गटातील 16 आमदारांना शिवसेनेकडून अपात्रतेची नोटीस पाठवण्यात आली होती आता त्याला उत्तर देण्यासाठी 12 जुलैच्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे तर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलैला होणार आहे.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना नोटीस बजावली आहे. या प्रतिवाद्यांना पुढील पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा