थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut ) महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता महापौर कुणाचा बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना एकनाथ शिंदेंना नगरसेवक फुटण्याची भीती असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक वांद्रे येथील ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
विजयी उमदेवारांचा मुक्काम पुढील 3 दिवस याच हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना ‘ताज लँड्स एंड’ हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत आज ताज लँड एंड हॉटेलमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊतांसह ठाकरेंचे नेतेही ताज लँड हॉटेलमध्ये जाणार आहेत. 'आम्ही ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहेत, आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी' असे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
Summary
खासदार संजय राऊत ताज लँड हॉटेलमध्ये जाणार
संजय राऊतांसह ठाकरेंचे नेते आज ताज लँड हॉटेलमध्ये
आम्ही ताज लँड हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहेत, आमच्यावर संशय घेऊ नका- संजय राऊत