महाराष्ट्र

'राजीनामा द्यायचा की नाही निर्णय उध्दव ठाकरेंचा,' एकनाथ शिंदेंची प्रतिक्रीया

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदार आता गुवाहटी येथे दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी सरकावर विरोधात बंडाचं निशाण फडकावणारे एकनाथ शिंदे यांनी यावेळी मोठा दावा केला आहे. "माझ्यासोबत केवळ ३५ नाही, तर ४० शिवसेना आमदारांचा पाठिंबा आहे. याशिवाय आणखी १० आमदार सोबत येणार आहेत", असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. याचदरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी एका वृत्तवाहिनेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अतिशय महत्वाची माहिती दिली आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांना त्यांची भूमिका काय असणार आहे असे विचारले असता, संध्याकाळी आमची बैठक होईल आणि तो निर्णय तुम्हाला कळवला जाईल असे एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. त्याचबरोबर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल का? असा प्रश्न शिंदे यांना विचारला असता, राजीनामा द्यायचा की नाही निर्णय उध्दव ठाकरेंनी घ्यायचा आहे. तसेच आमच्या सोबच आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक आमदार देखील आहेत. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. आमदारांना मारहाण केली नाही, त्यांना परत पाठवताना कार्यकर्तेही बरोबर दिले आहेत. संध्याकाळी आमची बैठक होईल आणि तो निर्णय तुम्हाला कळवला जाईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिल आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा