महाराष्ट्र

एकनाथ शिंदेचं 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन, पाहा Video

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं कळतंय. याचदरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केलं आहे. गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये त्यांनी 42 आमदारांसोबत शक्तिप्रदर्शन केले आहे. शिंदे यांच्यासोबत किती आमदार आहेत? हा प्रश्न विचारला जात होता. शिंदे 50 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र संध्याकाळपर्यंत राज्यपालांना देतील, असे मानले जात होते.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी १४४ हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे...शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक ५० आमदार आणि भाजपचे समर्थक ११४ आमदार असे मिळुन १६४ आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करून राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत.

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर आपला हक्क दाखवू शकतात का यावर बरेच तर्क वितर्क लढवले जात आहेत. दरम्यान त्यांनी विधिमंडळ गटनेता, पक्ष प्रतोद आणि पक्षांतरबंदी कायद्यानुसार हवे असलेले दोनतृतीयांश संख्याबळ या तांत्रिक मुद्द्यावर पूर्ण केले तर शिंदे गटाची बाजू कायद्याच्या कसोटीवर टिकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा