महाराष्ट्र

घटस्थापनेला उघडणार कार्ल्यातील एकविरा देवी मंदिर

Published by : Lokshahi News

सूशांत डूंबरे, मावळ | कोळी आग्री बांधवांची कुलदैवत लोणावळ्यातील कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या मंदिराचे दरवाजे घटस्थापनेला उघडणार आहेत. याचसोबत नवरात्रीचा कार्यक्रमही जाहिर करण्यात आला आहे. अशी माहिती देवस्थानचे मुख्य पुजारी संजय गोविलकर यांनी दिली आहे.

कार्ला येथील जगप्रसिद्ध लेण्यांच्या कुशीत वसलेल्या एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आश्विन शु. प्रतिपदेला म्हणजेच 7 ऑक्टोबरला घटस्थापना करण्यात येणार असून महानवमीचा होम 13 ऑक्टोबरला पहाटे होणार आहे, अशी माहिती देवस्थानचे मुख्य पुजारी संजय गोविलकर यांनी दिली आहे.

नुकतेच राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे आणि मंदिरे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रौत्सव कार्यक्रमांची माहिती गोविलकर यांनी दिली. गतवर्षी कोरोनामुळे देवीचा हा उत्सव अत्यंत साधेपणाने करण्यात आला होता. परंतु या वर्षी सालाबादप्रमाणे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता योग्य नियोजन करण्यात आले असून भाविकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे मुख्य प्रशासक यांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Malad : मुंबईतील मालाडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Update live : शेतकरी क्रांती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन

Mumbai Local Megablock : लोकलचं वेळापत्रक बघून करा प्रवास; तिन्ही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Ganesh Visarjan : 6 फुटांच्या मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन; POP विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना