थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Election Commission) महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. यातच नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननी पार पडली. निवडणूक आयोगाने सोमवारी एक पत्र जारी केलं. त्यानंतर ते पत्र मंगळवारी रद्द केलं.
पहिलं पत्र रद्द केल्यानंतर आज पुन्हा एकदा नव्याने एक शुद्धीपत्र काढण्यात आलं. ज्या डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक आहे, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या डमी उमेदवारांनी पाच सूचकांच्या स्वाक्षरीसह अर्ज दाखल केला असेल त्यांचेच अर्ज पात्र ठरणार आहेत.
तर नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या डमी उमेदवाराच्या नामनिर्देश अर्जात एक सूचक असल्यास डमी उमेदवाराचा अर्ज बाद होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
निवडणूक आयोगाने काढलं नवं शुद्धीपत्र
डमी उमेदवारांच्या अर्जावर एकच सूचक असल्यास अर्ज बाद
5 सूचकांच्या स्वाक्षरीसह दाखल केलेले अर्ज पात्र ठरणार