थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rahul Narwekar) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. राहुल नार्वेकर यांनी इतर उमेदवारांना धमकावून अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप करण्यात येत असून यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याप्रकरणी विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोग आता राहुल नार्वेकरांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याची माहिती मिळत आहे.
निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला असून निवडणूक आयोगाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही चित्रणही मागिवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Summary
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरील आरोपांची आयोगाकडून दखल
निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवला
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप