थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Navi Mumbai) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच राज्यात जवळपास 70 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) च्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) मधून भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांचा निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला होता.
याप्रकरणी त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र आता नवी मुंबईतील प्रभाग क्रमांक 17 (अ) मधून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलेले भाजपचे उमेदवार निलेश भोजने यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिल्याचे पाहायला मिळत आहे. आता नवी मुंबईतील प्रभाग '17 अ' मधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली असून शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
Summary
नवी मुंबईतील प्रभाग '17 अ' मधील निवडणुकीला स्थगिती
हायकोर्टाकडून निवडणुकीला अंतरिम स्थगिती
भाजपचे उमेदवार निलेश भोजनेंना दिलासा