Electric charging facility 
महाराष्ट्र

Electric charging facility : एसटी बस स्थानकांवर आता इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणाअंतर्गत राज्यातील एसटी महामंडळाच्या 196 बस स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

Published by : Team Lokshahi

(Electric charging facility ) महाराष्ट्र सरकारने अलीकडेच लागू केलेल्या इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणाअंतर्गत राज्यातील एसटी महामंडळाच्या 196 बस स्थानकांवर इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पर्यावरणपूरक वाहतूक वाढवण्यासाठी आणि हरित उर्जेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

परिवहन विभागाने एप्रिल 2025 पर्यंत 236.71 कोटी रुपये खर्च करून राज्यभरातील 78 एसटी बस स्थानकांवर चार्जिंग सुविधा कार्यान्वित केल्या आहेत. उर्वरित 118 स्थानकांवरही लवकरच सुविधा सुरू होणार असून, या कामाचा अंतिम टप्पा सुरू आहे. एकूण 251 आगार व 565 बस स्थानकांची पाहणी करून त्यातील 196 ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंगसाठी योग्य स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या प्रमुख विभागांचा त्यात समावेश आहे.

राज्य शासनाने 2023-24 या आर्थिक वर्षात 300 कोटी आणि 2024-25 मध्ये 85 कोटी रुपये असा एकूण 385 कोटी रुपयांचा निधी एसटी महामंडळाला मंजूर केला आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून चार्जिंग प्रकल्प राबवण्यात येत असून, प्रत्येक आगार व बस स्थानकांवर किमान एक जलद चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे धोरण राज्याच्या शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्याकडे वाटचाल करणारे ठरते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर