वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने सरकारने बैठक रद्द करण्याचे हत्यार उपसले 
महाराष्ट्र

Electricity Workers Strike | वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने कर्मचाऱ्यांसोबतची आजची बैठक रद्द

Published by : Shweta Chavan-Zagade

वीज कर्मचारी संघटनांना संप (Electricity Workers Strike) मागे घेण्याचे आवाहन करूनही यांनी संप मागे न घेतल्याने आज, 29 मार्चला त्यांच्यासोबत होणारी बैठक रद्द करण्याचा निर्णय ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे. दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांवर मेस्माची (Mesma) कठोर अंमलबजावणी करणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिलीये. त्याचबरोबर वीज कंपन्यांचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाहीही राज्य सरकारकडून (State Government) देण्यात आली आहे.

ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी आज व्हीसीद्वारे (video conferencing ) वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. चर्चेसाठी मी एक पाऊल पुढे टाकले आहे, तुम्हीही एक पाऊल पूढे टाका, असे आवाहन त्यांनी यावेळेस संघटनांना केले होते. राज्यातील वीज कंपन्यांचे खासगीकरण (Privatization) होणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली होती. तसेच कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहनही केले होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी सर्व कर्मचारी संघटनासोबत उद्या दुपारी ३ वाजता मुंबईत एक बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, रात्रीपर्यंत वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे न घेतल्याने उद्या दुपारी होणारी ही बैठक रद्द करण्याचा निर्णय डॉ. राऊत (Nitin Raut) यांनी घेतला आहे.

"राज्य शासनाची भूमिका ही खासगीकरणाविरोधात (Against privatization) आहे, आम्ही खासगीकरण होऊ देणार नाही. जनतेच्या हित जोपासण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यामुळे संप करून वीज कंपन्यांना खासगीकरणात लोटू नका अशी विनंती देखील केली होती,"असेही डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा