Electric Bond  
महाराष्ट्र

Electronic Bond : महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्डची सुरुवात; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय

महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (E-Bond) प्रणालीची सुरुवात होत आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • आता कागदी बॉण्डचा ताप संपणार

  • आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात

  • मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाचा निर्णय

(Electric Bond ) महाराष्ट्रात आजपासून इलेक्ट्रॉनिक बॉण्ड (E-Bond) प्रणालीची सुरुवात होत आहे. त्यामुळे कागदी बॉण्डची झंझट संपणार असून आयातदार व निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणी होऊ शकेल आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल. यापुढे बॉण्डमध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल करणे, रक्कम वाढवणे शक्य होईल. कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई-स्वाक्षरीमुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतील.

या उपक्रमासाठी National E-Governance Services Limited (NeSL) आणि National Informatics Centre (NIC) यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले आहे. आयात-निर्यात प्रक्रियेतील सीमाशुल्क व्यवहार आता पूर्णपणे डिजिटल होणार आहेत. ई-स्टॅम्पिंग, ई-स्वाक्षरी, ऑनलाइन पेमेंट, रिअल टाइम पडताळणी आणि डिजिटल रेकॉर्ड्स यांचा वापर करून सर्व प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे.

सरकारने या उपक्रमाद्वारे व्यवहार अधिक वेगवान, सुरक्षित आणि पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाइन भरता येणार असल्याने वेळ व खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल. उद्योग क्षेत्रासाठी ही प्रणाली मोठा दिलासा मानली जात आहे. कागदी कागदपत्रांची गुंतागुंत कमी होईल, व्यवहारातील खर्च घटेल आणि सीमाशुल्क प्रक्रिया अधिक कार्यक्षम होईल.महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांच्या कामकाजाला मोठी गती मिळणार असल्याची अपेक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Neena Kulkarni : मराठी रंगभूमीचा मानाचा बहुमान ; 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीला विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर

Rain Alert : पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार...

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमारने सांगितला त्याच्या मुलीला आलेला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?

Donald Trump : गेम चेंज! मोदींचा पाठिंबा मिळताच ट्रम्प उत्साही