महाराष्ट्र

नागपूर हादरलं! कुऱ्हाडीचा धाक दाखवून अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीवर भरदिवसा बलात्कार

नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज एक धक्कादायक घटना घडलेली आहे. ही घटना आज दुपारी घडलेली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्पना नळसकर | नागपूर : नागपूरच्या हिंगणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज एक धक्कादायक घटना घडलेली आहे. अभियांत्रिकी विद्यार्थिनी महाविद्यालयात जात असताना जामठ्याजवळील जंगलात एका अज्ञात आरोपीने कुऱ्हाडीचा धाक दाखवून विद्यार्थिनीला अडविले आणि जंगलात नेऊन बलात्कार केला आहे. ही घटना आज दुपारी घडलेली आहे. हिंगणा पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय तरुणी मूळची यवतमाळची आहे. ती हिंगण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बुधवारी ती यवतमाळवरून बसने नागपुरात आली. महाविद्यालय काही अंतरावर असल्यामुळे पायी जात होती. तो भाग जंगलाचा आहे. काही वेळातच एक आरोपी कुऱ्हाड घेऊन पाठलाग करायला लागला. त्याने तरुणीला गाठले आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तिला जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला

या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी तरुण पाठलाग करीत असल्यामुळे घाबरलेल्या तरुणीने बहिणीला फोन केला. बहिणीशी बोलतानाच त्याने तिचा मोबाईल हिसकवला आणि फोडला. त्यानंतर बहिणीने हिंगणा पोलिसांना माहिती दिली. तासाभराने हिंगणा पोलीस घटनास्थळावर पोहचले. तेथे भेदरलेल्या अवस्थेत तरुणी आढळून आली. दरम्यान, पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा