प्रशांत झवेरी
शहादा शहरात बॅटरीवर चालणाऱ्या चालत्या दुचाकीत स्पार्किंग झाल्यामुळे नवी गाडी जळून राखरांगोळी झालेली आहे. वाहनाच्या डिक्कीत एक लाख रुपये सह वाहनाच्या एक लाख 72 हजार रूपयाचे नुकसान झाले आहे.
शहादा शहरातील मेमन कॉलनीतील जुनेद आणि मेमन यांनी तीन महिन्यापूर्वी बॅटरीवर चालणारी दुचाकी खरेदी केलेली. जुनेद मेमन यांच्या सोडा बाटली व्यवसायासाठी बॅटरीवर चालणारी दुचाकी मोटरसायकल ही सोपस्कर झाली होती. पेट्रोलचा खर्च अवाक्या बाहेर जात असताना बॅटरीवर चालणारी मोटर सायकल मुळे पेट्रोलचा खर्च वाचू लागला होता.
गुरुवारी सायंकाळी चार साडेचारच्या दरम्यान जुनेद मेमन बॅटरीवर चालणारी मोटर सायकल व त्या डिक्कीत सुमारे एक लाख रुपये रोकड जात होते. अचानक गाडीत स्पार्किंग झाले आणि तीने पेट घेतला. बघता बघता अवघ्या दहा मिनिटातच वाहनाची राखरांगोळी झाली.