महाराष्ट्र

फडणवीसांचा होणार नारायण राणे; राष्ट्रवादीचा टोला

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये जाहीर भाषणामध्ये शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील, असं म्हणत राज्य सरकारबद्दल भाष्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील असा टोला लगावला आहे.

"नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न गेली २२ वर्षं बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले असून 'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या फडणवीसांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील." असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजपा नेते सांगत आहेत, कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही." असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे, असे अंदाज व्यक्त करण्यापलीकडे फडणवीसांच्या हातात काही नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : विजयी मेळाव्यात 'या' नेत्यांचीही होणार भाषणं; तर उद्धव ठाकरेंच्या भाषणाचे होईल समारोप