महाराष्ट्र

पुण्यात थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने मागितली खंडणी…

Published by : Lokshahi News

पुणे तिथे काय उणे अशी घटनाच घडली आहे. थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानेच खंडणी मांगितल्याची घटना समोर आली आहे. खरेदीतील आर्थिक वादाच्या प्रकरणातून ही खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल गोयल यांना राज्याचे उपमुख्यमंत्री खुद्द अजित पवार यांच्या नावे फोन करून खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्याजवळील वाडेबोल्हाईतील जागेचा वाद मिटवण्यासाठी अजित पवार यांचा नंबर फेक काॅल ह्या अॅपवर डाउनलोड करून फिऱ्यादीकडून २० लाख रूपयांची मागणी केली. एका साध्या बांधकाम व्यावसायिकाला खुद्द उपमुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने, शहरात चर्चांना उधाण आलं आणि एकच खळबळ माजली.

दरम्यान या प्रकरणी पोलीसांनी तपास करत नवनाथ भाऊसाहेब चोरमले, साैरभ नारायण काकडे, चैतन्य राजेंद्र वाघमारे व किरण राजाभाऊ काकडे ह्या आरोपींना गुन्हे शाखेद्वारे अटक केली. नवनाथ भाऊसाहेब चोरमले ह्या आरोपीच्या आजोबांकडून गोयल यांनी काही वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली होती. त्यावेळचे खरेदीतील आर्थिक वादाचे प्रकरण मिटवण्यासाठी हा फोन केल्याची माहिती मिळते आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणेश विसर्जन; 'वर्षा'वर भक्तिमय वातावरण

Latest Marathi News Update live : मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपतीचे पांचाळेश्वर घाट येथे विसर्जन पार पडले...

Hyderabad Tallest Ganpati Visarjan : हैदराबादमध्ये 69 फूट उंच मूर्ती! भारतातील सर्वात उंच बाप्पाला भावनिक निरोप देत विसर्जन पार; पाहा Viral Video

Pitru Paksha : ७ सप्टेंबरपासून पितृपक्षाची सुरुवात! 'या' गोष्टी चूकुनही करु नका