थोडक्यात
अभिनेता धर्मेंद्र यांच्या शाळेत बोगस शिक्षक भरती घोटाळा
शिक्षण विभागाचा बोगस कारभार चव्हाट्यावर
निलंबित उपशिक्षण अधिकारी उदय देवरे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात
(Malegaon) मालेगाव येथील अभिनेता धर्मेंद्र यांच्या सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये बोगस शिक्षक भरती झाल्याचे समोर आलं आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात 1 नोव्हेंबर 2023 रोजी विठोबा द्यानद्यान सामाजिक कार्यकर्ते यांच्या पाठपुराव्यावरून व आत्ताचे निलंबित उपशिक्षण अधिकारी उदय देवरे यांच्या तक्रारी गुन्हा दाखल करण्यात आला.
भद्रकाली पोलिसांकडून सन 2023 ते 2025 पर्यंत चार वेळा शिक्षण विभागाला समज पत्र, नोटीस पाठवून संबंधित प्रकरणाची कागदपत्रे मागितली मात्र दोन वर्ष उलटून देखील पोलिसांना नाशिक शिक्षण विभागाकडून कागदपत्र देण्यात न आल्याने पोलिसांना कोर्टात चार्जशीट दाखल करता येत नाही.
त्यावेळी सुद्धा जे तक्रारदार उपशिक्षण अधिकारी उदय देवरे होते तेच शिक्षण विभागात असल्याने त्यांनी तक्रार तर दिली मात्र हेतू पुरस्कर कागदपत्रे न देता पोलिसांच्या तपासात अडथळा निर्माण केला का? असे असेल तर त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल तक्रारदार करत आहेत.