महाराष्ट्र

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट;जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश

Published by : Lokshahi News

बालाजी सुरवसे, उस्मानाबाद | महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नावे बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करत आर्थिक लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थान,तुळजापूर ची अधिकृत वेबसाइट https://shrituljabhavani.org/ आहे. मात्र कुणी तरी अज्ञात लोकांनी https://www.tuljabhavani.in/ ही वेबसाइट सुरु करून भाविकांची लूट सुरु केली आहे.या वेबसाइटवर पूजा प्रसाद सेवा ही कॅटेगिरी दिली आहे. त्यावर क्लिक केले की,अभिषेक, अलंकार महापूजा,खण -नारळ ओटी पूजा,जागरण गोंधळ, अन्नदान अशा पूजा येतात.त्यानंतर पे फॉर प्रसाद सेवा म्हणून ऑप्शन येते त्यावर क्लिक केले की, फोन नंबर मागितला जातो आणि नंतर फॉर्म भरून पैसे वसूल केले जातात.

मंदिर संस्थानची अधिकृत वेबसाईट समजून लोक ही वेबसाइटच्या माध्यमातून पैसे पाठवत आहेत आणि त्यांची लूट केली जात आहे. या वेबसाइटवर कुणाचाही नंबर नाही. मात्र गुप्त माहितीनुसार ही वेबसाइट चालवणाऱ्याचा नंबर आम्हाला मिळाला आहे.तो सोबत जोडला आहे.वेबसाइट काढण्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच आजपर्यंत किती रुपयाचा आर्थिक घोटाळा झाला,या आर्थिक घोटाळ्यात कोण कोण गुंतलंय याचा शोध घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत,अशी मागणीही सुभेदार यांनी केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा