महाराष्ट्र

शाहरुखच्या वाढदिवशी 'मन्नत'बाहेर चाहत्यांचे 34 मोबाईल चोरीला

अभिनेता शाहरुख खानचा काल 58 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी गुरुवारी चाहत्यांनी मोठ्या

Published by : shweta walge

अभिनेता शाहरुख खानचा काल 58 वा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसानिमित्त शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील मन्नत या निवासस्थानी गुरुवारी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या गर्दीत चाहत्यांचे 34 मोबाईल चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील बंगल्याबाहेर शेकडो चाहते बुधवारी मध्यरात्रीपासून जमा झाले होते. या वेळी अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यानंतरही चोरट्यांनी 34 मोबाइलची चोरी केली. चोरी झाल्याच्या तक्रारी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. मुंबईसह पुणे, कोल्हापूर, सांगली, नांदेड या ठिकाणांहून लोक एसआरकेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते.

आलोक कुमार, अरबाज वाहिद खान, विनय वानखेडे, गुलाम कामरा, ध्रुव कोठारी, आयुष गाला, सुशील मोहिते, मंजीत तुफारकंती, संजय हलदर, अब्बास झागा, समीर इमाम, राज वोहरा, अल्काश ताडे, दिल सिंह, प्रिया राय आदि लोकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. शाहरुखच्या या सर्व चाहत्यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा