थोडक्यात
न्याय हक्कासाठी शेतकरी चढला टॉवरवर
धुळ्यातील शेतकरी चढला टॉवरवर
अधिग्रहित जमिनींचा मोबदला न मिळाल्याने आक्रमक
(Dhule Farmer) न्याय हक्कासाठी मेथी गावातील शेतकरी टॉवरवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. 13 वर्षांपूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनींचा मोबदला न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला असून तब्बल 6 तासांपासून शेतकरी टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे.
औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 12 वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेली जमीन परस्पर सौर प्रकल्पासाठी वापरली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मागील आंदोलनावेळी पालकमंत्र्यांनी एकरी 2 लाख रुपये देण्यासह जमीन अधिग्रहित केलेल्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीला नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं.
15 दिवस उलटूनही आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे.