महाराष्ट्र

शेतकऱ्यांचं आंदोलन हा ‘पब्लिसिटी स्टंट’; रामदास आठवले

Published by : Lokshahi News

नव्या कृषी कायद्यांविरोधात आणि विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली निघालेला हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत दाखल झाला आहे.शेतकऱ्यांच्या या मोर्चाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे.

"मुंबईतील शेतकऱ्यांचा मोर्चा हा फक्त पब्लिस्टिटी स्टंट आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची काहीच गरज नाही", असं मोठं विधान रामदास आठवले यांनी केलं आहे.

मुंबईतील आझाद मैदानात दाखल झालेले शेतकरी आज राजभवनाच्या दिशेनं कूच करणार असून शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना निवेदन सादर करणार आहेत.विशेष म्हणजे, या आंदोलनाला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.त्यामुळे या आंदोलनात शरद पवार देखील सामील होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या आंदोलनाची गरज नसल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

IPL 2024 : अभिषेक-क्लासेनचा झंझावात! वादळी खेळी करून पंजाब किंग्जचा उडवला धुव्वा, हैदराबादचा दमदार विजय

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...