थोडक्यात
दांड्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण, पायावरून गाडी घातली
तरुणावर जीवघेणा हल्ला
जातिवाचक शिवीगाळ करून तरुणावर जीवघेणा हल्ला
(Ahilyanagar)अहिल्यानगरमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पायावरून गाडी घालण्यात आली असून यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. जातिवाचक शिवीगाळ करून तरुणावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
एकदा नाही तर दोन वेळा तरुणाला मारहाण करण्यात आली असून तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आता 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.