थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Lavasa Case) आज लवासा प्रकरणावर अंतिम सुनावणी पार पडणार आहे. पवार कुटुंबियांवर गुन्हे दाखल करुन CBI चौकशीची मागणी करण्यात आली असून लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी वकील नानासाहेब जाधव यांनी याचिका दाखल केली आहे. आज सकाळी 11 वाजता या याचिकेवर सुनावणी होणार असून शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि ईतर अधिकाऱ्यांवर CBI मार्फ़त चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता या सुनावणीत काय होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
आज लवासा प्रकरणावर अंतिम सुनावणी
पवार कुटुंबियांवर गुन्हे दाखल करुन CBI चौकशीची मागणी
लवासा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने उभारल्याचा आरोप