महाराष्ट्र

Satara District Bank election | अखेर उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना गाठलेचं;एकमेकांना दिल्या शुभेच्छा

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप, सातारा | साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी आज बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका करत समोरासमोर येण्याचे आवाहन केलं होतं. तसेच उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना गाठणार असल्याचे मंगळवारी विधान केले होते. अखेर आज उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना गाठले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

गेल्या महिनाभरापासून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्यात निवडणुकीवरून शाब्दिक चकमकी उडत होत्या..दोघांनी एकमेकांवर टोकाची टीका करत समोरासमोर येण्याचे आवाहन केलं होतं. आज दोघांची बिनविरोध निवड झाल्याने हे आवाहन देखील संपुष्टात आले.

दरम्यान मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांना शिवेंद्रराजे यांना गाठणार असल्याचे उदयनराजेंनी सांगितलं होतं..त्यावर खासदार उदयनराजेंनी सुरुची येथे जाऊन आमदार शिवेंद्रराजे यांना भेटून निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.दोघांच्यात मतभेत नसल्याचे आमदार शिवेंद्रराजे यांनी सांगत वादावर पडदा टाकला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा