महाराष्ट्र

करीरोडमधील वन अविघ्न पार्क टॉवरमध्ये आग, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी

Published by : Lokshahi News

मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीत आग, अविघ्न टॉवरमध्ये आगीची घटना, अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला आहे. भीषण आगी जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. एका नागरिकानं जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारल्याचीही माहिती मिळत आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 25व्या मजल्यापर्यंत पसरली आहे. 

वन अविघ्न पार्क ही इमारत भारत माता थेअटर समोर आहे. लालबागमधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी ही इमारत ६० मजल्यांची असून १९ व्या मजल्यावर आग लागली आहे. आग लागल्यानंतर काहींनी खाली उड्या मारल्याची दृष्यही समोर आल्याचं एबीपीने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. एक व्यक्ती गॅलरीला लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच खाली पडल्याचंही दिसून आलं आहे. पडलेली व्यक्ती सुरक्षारक्षक असल्याची माहिती समोर आलीय. स्थानिक आमदार अजय चौधरींनी ही प्राथमिक माहिती दिली आहे. पाचव्या माळ्यावर आग लागल्यानंतर ती पसरली आणि १९ व्या माळ्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा