थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Supriya Sule) गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या घटनेत 23 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी असून जखमींना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 'गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झाली. ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परत यावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.'
'या घटनेमुळे उपाहारगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल्स,पब, बार यांच्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी अग्ऩिशमन यंत्रणा कार्यान्वित केलेल्या नाहीत. आपल्या राज्यातील सर्व उपाहारगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल्स,पब, बार यांचे फायर ऑडीट करणे गरजेचे आहे.'
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, 'माझी शासनाला नम्र विनंती आहे की, राज्यातील सर्व उपाहारगृहे, रेस्टॉरंट, हॉटेल्स, पब, बार, नाईट क्लब्ज याची नियमित फायर सेफ्टी तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी. राष्ट्रीय स्तरावर नवीन सुरक्षा मार्गदर्शक तत्वे जारी करणे आवश्यक आहे. नागरीकांच्या सुरक्षेसाठी हे अतिशय गरजेचे आहे.' असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Summery
गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये भीषण आग
आगीवर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
'नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी'