Narendra Modi
Narendra Modi  
महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार प्रदान

Published by : left

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ (Lata Dinanath Mangeshkar) पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर आज मुंबईतील षण्ङमुखानंद सभागृहात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

मुंबईतील षण्ङमुखानंद सभागृहात ‘लता दीनानाथ मंगेशकर’ (Lata Dinanath Mangeshkar) पुरस्कार सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, भाजपा नेते विनोद तावडे, किरीट सोमय्या आदींची उपस्थिती होती. यावर्षीपासून सुरू झालेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहेत. सर्वोत्कृष्ट देशसेवा आणि जनसेवेसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता

याचबरोबर उत्कृष्ट संगीत कारकीर्दीसाठी गायक राहुल देशपांडे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. तर सिनेमातल्या कारकिर्दीसाठी अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. सामाजिक कार्यासाठी आनंदमयी पुरस्कार नुतन मुंबई टिफीन चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे मुंबईच्या डब्बेवाल्यांना जाहीर झाला असून संध्याछाया या नाटकासाठी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि निर्माते श्रीपाद पद्माकर यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.

Uddhav Thackeray : 'मोदींवर संकट आलं तर मीही मदतीला धावून येईन, पण...', ठाकरेंचा PM मोदींना टोला

Loksabha Election 2024 : देशभरातील 12 राज्यांतील 94 जागांसाठी आज प्रचाराचा अखेरचा दिवस

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, आज आणि उद्या समुद्रकिणारी जाणं टाळावं, धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता

"उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रिपद हिरावून घेतलं, म्हणून..." कणकवलीत नारायण राणेंच्या सभेत 'राज'गर्जना

पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स बलात्कार नाही, तिच्या संमतीचीही आवश्यकता नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय