थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Kolhapur Congress ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
याच आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
काँग्रेसच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.शिवसेना उबाठा गटाच्या जागा वगळून ही यादी जाहीर केली आहे. उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वात प्रथम काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी ही यादी जाहीर केली.
Summery
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वात प्रथम काँग्रेसचे उमेदवार जाहीर
शिवसेना उबाठा गटाच्या जागा वगळून पहिली यादी केली जाहीर