( Shravan Somvar ) राज्यात अनेक ठिकाणी भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरांमध्ये मोठी गर्दी केली आहे. या दिवशी शिवमंदिरात विशेष पूजा आणि अभिषेक करण्यात येतो. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात पूजा,अभिषेक आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे.
यानिमित्त भाविकांनी राज्यभरातील महादेवाच्या मंदिरात गर्दी केली आहे. महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यावेळी मंदिर परिसर 'हर हर महादेव'चा जयघोषाने दुमदुमला आहे. श्रावण महिना शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो.
श्रावणात भगवान शंकराची पूजा केली जाते.मंदिरामध्ये पूजा आरती करण्यात येते. मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. पहिल्याच दिवशी देशभरातून शिवभक्त वेगवेगळ्या मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेत.पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त देशभरातील शिवमंदिरे भाविकांनी गजबजली आहेत.
भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त वेगवेगळ्या मंदिरात तैनात करण्यात आला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिरांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात येते.