महाराष्ट्र

चिपळूणात पुरानंतर आलेल्या साथीच्या रोगाचा पहिला बळी

Published by : Lokshahi News

निसार शेख | चिपळूण शहरातील जुना कालभैरव मंदिरा जवळील आदित्य शेखर कुलकर्णी वय 29 या तरुणाचे डेंग्यू सदृश तापाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महापुरानंतर शहरात ताप व सर्दी चे रुग्ण सापडत असून पुरानंतर हा पहिला बळी ठरला आहे.

कोरोनाने हॉटेल व्यवसाय ठप्प होता .तरीही त्यातून सावरत असताना महापुराने त्याचे सर्वस्व लुटलं.स्वच्छता करुन पुन्हा एकदा उभं राहण्याची तयारी करत असतानाच काळाने घाला घातला. फेसबुकवर मुक्त लिखाण करणाऱ्या आदित्यचे खूप फॉलोअर्स होते. लेखांक देण्याची त्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी होती. त्याचे लग्न देखील ठरले होते.पुरानंतर साफसफाई करून तो आजारी पडला.त्यात कोरोना लस देखील घेतली.त्यामुळे त्रास होऊन प्लेटलेट कमी झाल्या होत्या.दरम्यान रविवारी सायंकाळी शहरातील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.त्यामुळे शहरात अनेकांनी दुःख व्यक्त केले.

Dr. Narendra Dabholkar: डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण; 3 आरोपी निर्दोष, तर 2 दोषी

शांतिगिरी महाराज छगन भुजबळ यांची भेट घेणार

अनिल देशमुख यांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर; म्हणाले...

Devendra Fadnavis : मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करु शकत नाही

अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी