Loni Kalbhor | MIT college  team lokshahi
महाराष्ट्र

सांस्कृतिक पुण्यात काय सुरु आहे...चक्क कॉलेजबाहेरच दारुसाठी लागले फ्लेक्स...

पुण्यात कॉलेजबाहेरच लागले फ्लेक्स

Published by : Shubham Tate

पुण्यातील लोणी काळभोर इथल्या एम आय टी कॉलेज बाहेर विद्यार्थ्याना चक्क दारू पिण्यासाठी आमंत्रित करणारे फ्लेक्स लावण्यात आले होते. हा फ्लेक्स व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुण्यात सध्या काय सुरु आहे असा प्रश्न पडत आहे. याला कारणही तसंच होतं.

द टीपसी टेल्स या हॉटेलचा हा फ्लेक्स होता. लोणी इथल्या कॉलेजच्या बाहेरच हा फ्लेक्स होता. यात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर देण्यात आली होती. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आयडी कार्ड दाखवा आणि विशेष सवलतीत कितीही ड्रिंक्स घ्या अशी सार्वजनिक जाहीरात देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांना दारू पिण्यासाठी खास सवलत देणाऱ्या या हॉटेलवर पोलिस आणि उत्पादन शुल्काकडून कारवाई व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांची होती. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी देवीप्रसाद शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हे पोस्टर वायरल झाल्यानंतर काही वेळात ते काढून टाकण्यात आले आहेत. मात्र या घटनेने एकचं खळबळ उडाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा