महाराष्ट्र

Monsoon Update | अकोल्यात नाल्याला पुर; नागरीकांचे हाल

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाल्याने पहील्याच दिवसात सर्व नद्या-नाल्ये भरभरुन वाहु लागले. त्यामुळे नागरिकांची चांगलीच ताळांबळ उडाली. अकोल्यातही असेच काहीसे घडले. अकोल्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने न्यू तापडिया नगर येथील क्रांती चौक परिसरातील नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे नाल्याचा काही भाग वाहून गेल्याने दुसऱ्या बाजूस असलेले नागरिक यामध्ये फसले. सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरी बांधून रेस्क्यु केले.

नाल्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की, आसपासच्या काही घरांमध्ये पाणी भरले. नाल्यांमध्ये जलकुंभी असल्यामुळे ते पाणी जायला वेळ लागला आणि नाल्याला मोठा पूर आला. रात्रभर फसलेल्या नागरिकांना सकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी व स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा