flood  Team Lokshahi
महाराष्ट्र

मान्सूनची तयारी; राज्यात प्रथमच NDRF च्या ९ तुकड्या तैनात

मागील वर्षीच्या पुरातून ठाकरे सरकारने घेतला धडा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात काही दिवसांत मान्सून (Monsoon) दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर आज मान्सूनपूर्व बैठक पार पडली. यामध्ये मागील वर्षी उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यानुसार प्रथमच राज्यात एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली.

पावसाळयात नैसर्गिक आपत्तीचा धोका वाढत असून ऐनवेळी मदत व बचावकार्य करण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रथमच एनडीआरएफच्या ९ तुकड्या ७ जिल्ह्यांमध्ये आधीपासूनच तैनात करण्यात आल्याची माहिती आज मान्सूनपूर्व आढावा बैठकीत राज्य आपत्ती व्यवस्थापनाने दिली आहे.

ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम १५ जूनपासून तैनात असतील. याच पद्धतीने राज्य आपत्ती प्रतिसाद दल म्हणजे एसडीआरएफची एक तुकडी नांदेड व एक तुकडी गडचिरोली येथे १५ जून ते १५ सप्टेंबर या कालावधीत तैनात करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा रितीने पूर्वनियोजित पद्धतीने केलेल्या व्यवस्थेवर समाधान व्यक्त केले आहे.

पावसाळयात धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग हा नेहमीच महत्वाचा मुद्दा असतो. पूर नियंत्रण जलसंपदा विभागाचे अधिकारी नियोजनाने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतात. त्यादृष्टीने संबंधित अभियंत्यांनी या काळात कोणत्याही परिस्थितीत धरणाच्या जागेवरच राहावे आणि मुख्य अभियंता यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय अजिबात सोडू नये, असे निर्देशच आजच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

पूर नियंत्रणाच्या दृष्टीने धरणातून किती पाणी कसे सोडण्यात येत आहे ते सर्वसामान्यांना रियल टाईम कळावे म्हणून जलसंपदा विभागाने यंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे धरण क्षेत्रातील व परिसरातील नागरिकांना आगाऊ सूचनाही मिळणार आहेत. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती ही माहिती जलसंपदा विभागाच्या वेबसाईटवरून १५ जूनपासून लाईव्ह पाहू शकतो. तंत्रज्ञानाचा अवलंब करून ही यंत्रणा उभारल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. व गेल्या वर्षी चिपळूण पुरानंतर आपण आढावा घेऊन यासंदर्भात दिलेल्या सूचनेप्रमाणे ही यंत्रणा सुरू होत आहे याचा निश्चित उपयोग होईल, असे सांगितले

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुखद ! काका-पुतण्याच्या गळाभेटीने महाराष्ट्र सुखावला, आता पुढे काय होणार ? याकडे सगळ्यांचेच लागले लक्ष