Haribhau Naik  Team Lokshahi
महाराष्ट्र

Haribhau Naik : ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचे निधन

नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Published by : Team Lokshahi

माजी कामगार राज्यमंत्री आणि ज्येष्ठ कामगार नेते राज्यमंत्री हरिभाऊ नाईक (Haribhau Naik) यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या ( Nagpur Municipal Corporation) महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसंच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले आहे.

हरिभाऊ नाईक हे आपल्या नैतिक मूल्यांसाठी ओळखले जात. त्यांनी १९७१ मध्ये महापौर असताना काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या अपक्षाच्या गटातील उमेदवाराचा उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने नैतिकता जपण्यासाठी महापौरपदाचा राजीनामा दिला होता. 'ज्या पक्षाचे व त्याला पाठिंबा देणाऱ्या गटाचे मी नेतृत्त्व करत आहे, त्याच गटातील उमेदवाराबाबत दगाफटका होत असेल तर सत्तेत राहण्याचा अधिकार उरत नाही म्हणून मी पाऊल उचललं' , अशी भूमिका त्यांनी घेतली होती. नाईक यांच्या जाण्याने कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

कामगारांबद्दल आस्था असणारा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढा देणारा नेता गमावल्याने राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.नाईक यांनी मध्यरात्री १ वाजता आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नाईक यांच्यावर आज सायंकाळी ४ वाजता मोक्षधाम, घाट रोड नागपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा