महाराष्ट्र

माजी मंत्री संजय राठोडांच्या अडचणीत वाढ; शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार

Published by : Lokshahi News

यवतमाळ जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एका महिलेने त्यांच्यावर शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप केला आहे. या संबंधित तक्रार महिलेने घाटंजी पोलिसांना स्पीड पोस्टाने पाठवली आहे. हि तक्रार घाटंजी पोलिसांना प्राप्त झाली असून त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले आहे.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना आमदार माजीमंत्री संजय राठोडवर शरीरसुखाची मागणी केल्याची लिखीत सविस्तर तक्रार एका भगिनीने पोलिसांना पोस्टाने पाठवल्याची माहिती दिली. तसेच मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करतं लैंगिक छळ करतो असं ही त्यात म्हंटलंय असल्याचं चित्रा वाघ म्हणत आहेत.

दरम्यान या प्रकरणामुळे आता संजय राठोड पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संबंधित तक्रार महिलेने घाटंजी पोलिसांना स्पीड पोस्टाने पाठवली आहे. हि तक्रार घाटंजी पोलिसांना प्राप्त झाली असून त्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा