महाराष्ट्र

नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published by : Lokshahi News

संदिप जेजूरकर, येवला ( नाशिक ) | नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत येवल्यात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान संजय पवार यांच्या प्रवेशाने स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची शक्ती वाढवण्यास गती मिळणार आहे.

नांदगांवचे माजी आमदार संजय पवार यांनी आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला..येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला.

माजी आमदार संजय पवार हे २००४ ते २००९ या कालावधीत शिवसेनेचे नांदगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार होते.मध्यंतरीच्या काळात त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता..त्यानंतर पुन्हा शिवसेना – राष्ट्रवादी व भाजपा असा त्यांचा प्रवास होता.गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच सक्रिय होते.

आज अखेर त्यांनी भुजबळांच्या हस्ते येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकृतरीत्या राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश केला.नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश केल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले असून पवार यांच्या प्रवेशाने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट होणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले..

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा