माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सूरू आहेत.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची तब्येत मंगळवारी अचानक बिघडल्यामुळं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंग यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं आणि छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात AIIMS मध्ये भरती करण्यात आलं आहे. मनमोहन सिंग यांच्यावरील उपचारासाठी एम्सकडून एक टीम बनवली जात असून त्याचे प्रमुख हे डॉ. रणदीप गुलेरिया असणार आहेत.