थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shivraj Patil Passes Away) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारपणामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
लातूरमधील त्यांच्या 'देवघर' या निवासस्थानी सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून लोकसभेचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली होती. तसेच, केंद्र सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री यासह विविध महत्त्वपूर्ण मंत्रीपदांवर काम केलं होतं. शिवराज पाटील चाकूरकर लातूरचे 7 टर्म खासदार होते.
1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. शिवराज पाटील चाकूरकर हे आजन्म काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून निवृत्त झाले होते. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
Summery
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन
वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
लातूरच्या राहत्या घरी शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन