Sexual Harassment Team Lokshahi
महाराष्ट्र

Pune Sexual Harassment|पुण्यात तरुणाला चौघांनी दिली सेक्सची ऑफर, पुढे घडला विचित्र प्रकार

त्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली

Published by : Team Lokshahi

पुण्यातील (Pune) एका महाविद्यालयात एमबीए (MBA) करणाऱ्या एका तरुणाला पुण्यात चौघांनी सेक्सची ऑफर देत बोलावून घेतलं. त्यानंतर त्याला रात्रभर डांबून ठेवलं, त्याच्या जवळचे सर्व पैसे काढून घेतले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर त्याला गे असल्याचे सर्वत्र व्हायरल (Viral video) करेन अशी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खडकी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपींना पोलिसांनी (pune police) अटक केली आहे. (Four arrested for sexually abusing a youth in Pune)

साहिल कुरेशी, अनिकेत जाधव, सुदामा चौधरी, रोहित चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 24 वर्षीय तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मध्यवस्तीत दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला.

गे असल्याचे दाखवू अशी भीती घालत काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल घेतला. त्यानंतर त्यांनी त्याच्या मोबाईलवरून ऑनलाईन 55 हजार 679 रुपये ट्रान्सफरकरून घेतले. त्यानंतर रात्रभर त्याला खोलीतच डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला सोडून दिले. त्यानंतर या तरुणाने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानूसार पोलिसांनी चौघांनी अटक केली. साहिल कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात